गुड न्यूज! महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बोगद्याचं काम पूर्ण, समृद्धी महामार्गावरील बोगदा तयार

in #india2 years ago

नाशिक : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बोगद्याचं काम जवळपास पूर्णत्वास आलं आहे. इगतपुरी आणि कसारा यांना जोडणारा आणि समृद्धी महामार्गाचा एक भाग असलेला महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा जवळपास तयार झाला आहे. लांबीच्या बाबतीत हा भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लांब बोगदा आहे आणि १८ मीटर रुंदीचा असून तो सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक आहे. मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृध्दी महामार्गावर इगतपुरी ते कसारादरम्यान ७.७८ किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा आहे.एनफ्रास्ट्रक्चर कंस्ट्रक्शन कंपनी अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड कंपनी हा बोगदा बांधत आहे. हा बोगदा आंतरराष्ट्रीय दर्जाचा असेल, असा कंपनीचा दावा आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हा बोगदा अनेक सुविधांनी सुसज्ज करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडाळाने प्रकल्पावर नेमलेल्या टीमचे प्रमुख माजित इम्रान यांनी दिली. इगतपुरी विभागातील १३ किमी रस्त्याचे बांधकाम अफकॉन कंपनी २७४५ कोटींचा खर्चात करत आहे. यात बोगद्याचा समावेश आहे.

दोन बोगद्यांना जोडण्यासाठी २६ क्रॉस पॅसेज आहेत, जे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वापरले जाऊ शकतात. हवेच्या योग्य परिसंचरणासाठी आम्ही प्रत्येक बोगद्यात ५४ मोठे पंखे बसवले आहेत. अनधिकृत प्रवेश आणि सुरक्षेसाठीसाठी बोगद्याजवळील भाग हा मोठ्या भिंती आणि काटेरी तारांनी वेढलेला आहे, अशी माहिती इम्रान यांनी दिली. १०० ते १२० प्रतितास इतक्या वेगाने वाहने बोद्यातून जाऊ शकतात.maharashtras-longest-road-tunnel-94875644.jpg