'नासा'च्या मिशन मूनला धक्का! पुन्हा आर्टेमिस-१ च्या प्रक्षेपणात इंधन गळतीची समस्या

in #india2 years ago

नाव दिल्ली : जगाच्या नजरा लागून राहिलेल्या नासाच्या चंद्र मोहिमेच्या दुसऱ्या प्रक्षेपणाच्या वेळी इंधन गळती झाली. त्यामुळे दुसरा प्रयत्न पुन्हा अपयशी ठरला आहे. शास्त्रज्ञांच्या अनेक प्रयत्नांनंतरही ही गळती थांबवता आली नाही. त्यानंतर नासाच्या अधिकाऱ्यांनी रॉकेट प्रक्षेपणाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (Nasa Artemis mission news in Marathi)

हेही वाचा: USA: वॉलमार्ट स्टोअरवर विमान क्रॅश करण्याची धमकी; अमेरिकेत खळबळ

पाच दिवस आधीही इंधन गळतीमुळे हे अभियान नियोजित वेळेच्या पुढे ढकण्यात आले होते. नासाचे हे महत्त्वाकांक्षी मिशन फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केले जाणार आहे.मानवयुक्त मोहिमेअंतर्गत नासाचे हे पहिले रॉकेट आहे, जे फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून निघून चंद्राभोवती फिरून काही महत्त्वाची माहिती नासाला पाठवेल. यामध्ये स्पेस लॉन्च सिस्टम- SLS वापरण्यात येत आहे. या मोहिमेच्या यशानंतर, नासा आर्टेमिस-2 आणि आर्टेमिस-3 मोहिमांवर काम करेल. आर्टेमिस 3 मिशन अंतर्गत, 2024 मध्ये नासा तब्बल 50 वर्षांनंतर पुन्हा चंद्रावर मानव पाठवणार आहे. मात्र त्यासाठी आर्टेमिस-१ मिशन यशस्वी होणे खूप महत्वाचे आहे.esakal_new.jpg