आमचं नातं कसंय हे नरेंद्र मोदीच सांगतील; डोनाल्ड ट्रम्प यांनी गायले गोडवे

in #india2 years ago

esakal_new___2022_09_08T145324_877.jpgअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०२४ ची राष्ट्रपती निवडणूक लढवण्याचे संकेत देत भारत आणि पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी चांगलं काम करतायत, अशा शब्दांत त्यांनी मोदींची वाहवा केली आहे. त्यांचं काम सोपं नाही, आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. (Donald Trump praises PM narendra modi)

एनडीटीव्हीने याबद्दलचं सविस्तर वृत्त दिलं आहे. त्यांना विचारण्यात आलं की, जो बायडेन आणि बराक ओबामा यांच्याहीपेक्षा जास्त घट्ट नातं तुमचं भारताशी आहे का? त्याला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की मला वाटतं, माझं नातं कसं आहे, हे तुम्हाला पंतप्रधान मोदींना विचारावं लागेल. पण मला नाही वाटत की भारताला कधी ट्रम्पपेक्षा जास्त चांगला मित्र मिळाला असेल. मोदींचं कौतुक करताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पंतप्रधान मोदी चांगलं काम करत आहेत. आम्ही मित्र आहोत, मला वाटतं की ते एक चांगली व्यक्ती आहेत आणि खूप चांगलं काम करत आहेत. त्यांचं काम सोपं नाहीये. ते चांगले आहेत.तसंच ट्रम्प यांना राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला पुन्हा उभे राहणार का, याबद्दलही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, सगळ्यांना वाटतंय मी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवावी. सर्वेक्षणातही मी पुढं आहे. मला वाटतं की मी लवकरच याबद्दलचा निर्णय घेईन.