YouTube Premium चा मोफत आनंद घ्या अन् ते पण Ads free, जाणून घ्या कसं

in #in2 years ago

YouTube हे जगभरातील एक आवडते व्हिडिओ स्ट्रीमिंग ॲप आहे. परंतु त्यावरचे व्हिडीओ पाहताना भरपूर ads येतात आणि या ads चा खूप वैतागही येतो. जर तुम्हाला AD Free YouTube व्हिडिओ बघायचे असतील तर त्यासाठी YouTube premium घेऊन पैसे खर्च करावे लागतात. पण जर आम्ही तुम्हाला म्हटलो की तुम्ही हे वैशिष्ट्ये फुकट मिळवू शकतात. (check how to get YouTube premium with ads free)YouTube Vanced: जर तुम्हाला AD Free YouTube व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत. यासाठी YouTube Vanced हे अतिशय लोकप्रिय ॲप आहे. याच्या मदतीने युजर्स Ads free YouTube व्हिडिओ पाहू शकतात. यामध्ये कोणतेही सबस्क्रिप्शनचे पैसे भरावे लागणार नाही. काही महिन्यांपूर्वी ही सेवा बंद करण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली होती. पण YouTube Vanced अजूनही बहुतांश वापरकर्त्यांसाठी कार्यरत आहे. त्याची लोकप्रियताही खूप वेगाने वाढली आहे. एका रिपोर्टनुसार, जगभरात लाखो लोक हे ॲप वापरतात. पण, गुगलकडून कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर कंपनीने ही सेवा बंद करण्याची घोषणा केली.तरीही तुम्ही थर्ड पार्टी साइटवरून हे ॲप इंस्टॉल करता येईल. हे फक्त अँड्रॉइड फोनसाठी उपलब्ध करून दिलेले आहे.