Pune: शेतीसाठी बक्कळ पगाराच्या नोकरीकडे फिरवली पाठ; आज करतोय कोट्यवधीची उलाढाल

in #in2 years ago

पुणे - पिंपरी-चिंचवडमधील एका मोठ्या कंपनीतील नोकरीला अवघ्या दीड वर्षात रामराम करत कृषी प्रक्रिया उद्योगात उतरलेल्या ३१ वर्षीय यांत्रिक अभियंता (मेकॅनिकल इंजिनिअर) तरुणाने अंजीर उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगात गरुडझेप घेतली आहे. अगदी पंचविशीत असताना शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली आणि या कंपनीच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना एकत्रित आणत अंजीर शेतीतून वार्षिक सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या उलाढालीची किमया केली आहे. समीर मोहनराव डोंबे असे या अभियंता तरुणाचे नाव आहे. ते दौंड तालुक्यातील खोर येथील रहिवासी आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यामागे त्यांनी अंजीर फळांच्या उत्पादनात वाढ करणे, त्यांची विक्री करणे आणि अंजीर फळांवर प्रक्रिया करून त्यातून उपपदार्थ तयार करणे, असा हेतू ठेवला आहे. या कंपनीला ‘पवित्रक’ असे नाव देण्यात आले आहे. अंजीर फळाला संस्कृतमध्ये पवित्रक म्हटले जाते. त्यामुळे त्यांनी या कंपनीला अंजीर फळाचेच संस्कृत भाषेतील नाव दिले आहे. समीर यांचे वडील मोहनराव डोंबे हे पेशाने शिक्षक. ते तेथील माध्यमिक शाळेत अध्यापनाचे काम करत करत, शेतीही करतात.समीर यांनी खोर येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर गावातीलच सरस्वती माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण, पुणे शहरातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीनंतर हडपसर येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून यांत्रिक अभियांत्रिकीचा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) पदविका पूर्ण केली. त्यानंतर बिबवेवाडी येथील विश्‍वकर्मा इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. या पदवीनंतर त्यांना पिंपरी-चिंचवड येथील जीकेएल सिंटर मेटल्स या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली. परंतु या नोकरीत ते फार काळ रमले नाहीत. उणेपुरे अवघ्या दीड वर्षाच्या सेवेनंतर ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. ही नोकरी सोडल्यानंतर अंजीर शेतीबरोबरच अंजीर प्रक्रिया उद्योगात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो प्रत्यक्षात आणला.उपपदार्थांचीही निर्मितीकंपनी स्थापन करत अंजीर फळांवर प्रक्रिया करून त्यातून अंजीर जेली, जॅम आदी उपपदार्थांची निमिर्ती करण्यास सुरवात केली. या

Sort:  

Jis topic se related news paste karte hai sirf wahi type kere sath mein in na lagaye aap notice kero news mein in in do baar repeat hai her jagah so write only wortheun not in wortheum .in auto included hai 🙏🙏