IPL 2023 Auction :डिसेंबरमध्ये ठरणार जडेजा CSK की GT चा; BCCI लिलावाचं करतंय प्लॅनिंग?

in #in2 years ago

IPL 2023 Auction : भारतीय क्रिकेट नियाम मंडळ (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा लिलाव हा त्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात घेण्याचे प्लॅनिंग करत आहे. 16 डिसेंबरला हा लिलाव होण्याची शक्यता आहे. ही तात्पूरती काढलेली तारीख आहे. याबाबत बीसीसीआय आयपीएल फ्रेंचायजींशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल. (Eye On Ravindra Jadeja Shubman Gill)
ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

IPL 2023 Auction :डिसेंबरमध्ये ठरणार जडेजा CSK की GT चा; BCCI लिलावाचं करतंय प्लॅनिंग?
Published on : 23 September 2022, 1:56 pm

By
अनिरुद्ध संकपाळ

IPL 2023 Auction : भारतीय क्रिकेट नियाम मंडळ (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा लिलाव हा त्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात घेण्याचे प्लॅनिंग करत आहे. 16 डिसेंबरला हा लिलाव होण्याची शक्यता आहे. ही तात्पूरती काढलेली तारीख आहे. याबाबत बीसीसीआय आयपीएल फ्रेंचायजींशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल. (Eye On Ravindra Jadeja Shubman Gill)

हेही वाचा: Dilip Tirkey : माजी हॉकीपटू दिलीप तिर्की हॉकी इंडियाचा नवा अध्यक्ष

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल 2023 चा लिलाव हा मिनी लिलाव असणार आहे. हा लिलाव कोठे होणार याचे ठिकाण अजून ठरलेले नाही. लीगच्या तारखा देखील निश्चित झालेल्या नाहीत. मात्र आयपीएल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यंदाची आयपीएल ही जुन्या होम अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे.आयपीएल 2023 च्या लिलावाची सॅलरी पर्स ही 95 कोटी असणार आहे. ही गेल्या वर्षीपेक्षा 5 कोटी जास्त असेल. जर फ्रेंचायजी एखाद्या खेळाडूला रिलीज किंवा ट्रेड करत असेल तर त्यांची पर्स अजूनही फुगणार आहे. आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रविंद्र जडेजा यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे 2023 च्या मिनी लिलावात रविंद्र जडेजाला सीएसके रिलीज किंवा दुसऱ्या संघासोबत ट्रेड करू शकते.

Sort:  

hi