Chhagan Bhujbal : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर भुजबळांचं स्पष्टीकरण; म्हणाले, देशाविरुध्द बोललो तर ती..

in #in2 years ago

Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP leader) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळं सध्या ते चर्चेत आहेत. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजेत, त्याऐवजी शाळेत सरस्वती (Saraswati) आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला होता.विधानानंतर आज भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, त्या दिवशी सत्यशोधक समाजाचा आदर करण्याचा कार्यक्रम होता. माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे. देशाच्या विरुध्द बोललो तर ती वेगळी गोष्ट आहे. पण, मी इतकंचं म्हटलं की फुले, शाहू, आंबेडकरांनी आपल्याला प्रत्यक्ष शिकवलं आहे आणि त्यांचा आम्ही आदर करायला हवा. आपण त्यांची का पूजा करत नाही. त्यांची पूजा करायला हवी, असं माझं म्हणणं होतं. सरस्वतीनं आपल्याला काही शिवकवलं नाही, त्यामुळं पूजनाचा प्रश्न येतोच कुठं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Thursday, September 29, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Chhagan Bhujbal : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर भुजबळांचं स्पष्टीकरण; म्हणाले, देशाविरुध्द बोललो तर ती..
Published on : 29 September 2022, 7:28 am

By
सकाळ डिजिटल टीम
दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं.

Chhagan Bhujbal News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP leader) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. यामुळं सध्या ते चर्चेत आहेत. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजेत, त्याऐवजी शाळेत सरस्वती (Saraswati) आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. भुजबळांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला होता.
RECOMMENDED ARTICLES

Health Tips : फक्त उन्हातूनच नाही तर 'या' पदार्थांतूनही मिळते व्हिटॅमिन डी
कोवळे सूर्य किरणं हे आपल्याला व्हिटॅमिन डी देतात, हे सर्वांना माहित आहे.
5 hours ago

Hingoli : दसरा महोत्सवाची द्विशताब्दीकडे वाटचाल
हिंगोली : हिंगोलीच्या दसरा महोत्सवाची द्विशताब्दीकडे वाटचाल सुरू असून, यावर्षी १६८ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. दक्षिण भारतातील म्हैसूर नंतर हिंगोलीचा दसरा प्रसिद्ध आहे. १८८५ मध्ये येथील कयाधू नदीच्या काठावर असलेल्या खाकीबाबा मठात संत मानदासबाबा यांच्या पुढाकाराने दसरा सुरू झाला होता. त्य
5 hours ago

Maharashtra Politics: अशोक चव्हाणांची क्लिप जाहीर केली तर...;आशिष शेलारांच सूचक विधान
भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ माजली आहे. कॉँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची एक क्लिप जाहीर केली तर अडचण होईल असं भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हंटल आहे. यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी अशोक चव्हाण यांना सूचक इशारा दिला आहे.
5 hours ago
Viral Video : ऑनलाईन मागवला ड्रोन हाती आला बटाटा; पहा व्हिडीओ
ऑनलाईन ऑर्डर केल्यानंतर मागवलेली वस्तू ऑनलाइन वेगळी आणि प्रत्यक्षात वेगळी असणं, त्यात काही तरी त्रुटी असणं किंवा मागवली एखादी वस्तू आणि आलं काही भलतंच. हे सर्वकाही नवं नाही. तुम्हीसुद्धा ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुम्हालाही कधी ना कधी तरी असा अनुभव आलाच असेल. याचा खूप मनस्तापही होतो. वेबसा
5 hours ago
या विधानानंतर आज भुजबळांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, त्या दिवशी सत्यशोधक समाजाचा आदर करण्याचा कार्यक्रम होता. माझं मत मांडण्याचा मला अधिकार आहे. देशाच्या विरुध्द बोललो तर ती वेगळी गोष्ट आहे. पण, मी इतकंचं म्हटलं की फुले, शाहू, आंबेडकरांनी आपल्याला प्रत्यक्ष शिकवलं आहे आणि त्यांचा आम्ही आदर करायला हवा. आपण त्यांची का पूजा करत नाही. त्यांची पूजा करायला हवी, असं माझं म्हणणं होतं. सरस्वतीनं आपल्याला काही शिवकवलं नाही, त्यामुळं पूजनाचा प्रश्न येतोच कुठं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा: Navratri : नवरात्रोत्सवात मुस्लिम दुकानांतून कोणत्या वस्तू घेऊ नका; साध्वी प्रज्ञांचं आवाहन

काय म्हणाले होते छगन भुजबळ सोमवारी छगन भुजबळ यांनी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त आयोजित महोत्सवात उपस्थितांना संबोधित केलं. त्यावेळी त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शाळेत महापुरूषांचे फोटो लावले पाहिजे, त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदा मातेचे फोटो का लावले जातात? असा सवाल भुजबळांनी केला होता. देशात अंधश्रद्धा वाढीला लागण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोपही यावेळी छगन भुजबळांनी केला. अंधश्रद्धा आणि आमच्या महिला-भगिनींबाबत काही विचारायला नको किंवा काही सांगायला नको. शाळांमध्ये सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. पण सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेबांचा फोटो लावा, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा फोटो लावा. कारण सरस्वतीचा, शारदा यांना आम्ही काही पाहिलं नाही. त्यांनी आम्हाला काही शिकवलं नाही. त्यांनी तीन टक्के लोकांना शिकवले. आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची, असं भुजबळ म्हणाले होते.

Sort:  

hi