IND vs AUS: हैदराबादमध्ये इतिहास रचण्याची संधी, भारत मालिका जिंकण्याच्या तयारीत

in #in2 years ago

India vs Australia 3rd t20 Match : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ आज येथे होणाऱ्या अखेरच्या टी-20 लढतीत मालिका विजयाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवणार हे निश्चित आहे. मोहालीत पराभूत झाल्यानंतर नागपूरमधील दुसऱ्या टी-20 लढतीत 6 गडी राखून विजय साकारल्यानंतर आता टीम इंडिया विश्वकरंडकाआधी मालिका विजयाला गवसणी घालून आत्मविश्वास मिळवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. अर्थात भारतीय संघाला यानंतर दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करावयाचे आहेत; पण त्याआधी हर्षल पटेल व युझवेंद्र चहलचा फॉर्म हा भारतासाठी चिंतेचा विषय असणार आहे.कर्णधार रोहित, के. एल. राहुल व विराट कोहली या पहिल्या तीन क्रमांकाच्या फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य असायला हवे. गेल्या काही सामन्यांमध्ये या तीन फलंदाजांकडून सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव दिसून येत आहे. सूर्यकुमार यादवकडून मोठ्या अपेक्षा आहेत, पण त्याचा फलंदाजी फॉर्मही चढ-उतारामधून जात आहे. आयपीएलपासून हार्दिक पंड्याच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. फलंदाजी तसेच गोलंदाजी या दोन्हीमध्ये त्याने. आपला ठसा उमटवला आहे. दिनेश कार्तिकने नागपूर लढतीत फिनीशर म्हणून आपली ओळख जपली.गोलंदाजांनी सुधारणा करावी जसप्रीत बुमराहचे दुसऱ्या लढतीत पुनरागमन झाले. त्याने अॅरॉन फिंचचा त्रिफळा उडवला आणि भारतासाठी निर्णायक कामगिरी बजावली. अक्षर पटेल यानेही दोन षटकांमध्ये प्रभावी कामगिरी केली, पण हर्षल पटेल व युझवेंद्र चहल यांच्या कामगिरीत सुधारणा आवश्यक आहे.

Sort:  

hi