Voting From Home : देशाच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच 'घरुन मतदान' पर्याय यशस्वी

in #hingoli2 years ago


मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील 'अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रिये अंतर्गत दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. यंदाच्या या निवडणुकीचे एक महत्त्वाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या निवडणूक इतिहासात 'घरुन मतदान' हा उपक्रम पहिल्यांदाच राबविण्यात आला आहे. शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक परिस्थितीत असणाऱ्या व ८० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत 'घरुनच मतदान' (Voting from Home) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तब्बल ९१ टक्के मतदारांनी हा पर्याय यशस्वीपणे वापरला.

Sort:  

hello sir
wortheum ek media platform hain kripya ise ka sahi istmal kare. yadi aap copy paste karte ho any user ki traf se aapko downvote kiya jayega

thank you 🌹