Artemis 1 Mission : मानवी चांद्रमोहिमेच्या दिशेने पाऊल...

in #hingoli2 years ago


: नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’(नासा) या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने अपोलो मोहिमेच्या ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा मानवी चांद्रमोहिमेच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा पहिला टप्पा आणि पूर्वतयारीसाठी अर्टिमिस-वन मोहिमेअंतर्गत ओरायन अंतराळयान बुधवारी दुपारी पावणेबाराच्या (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुमारास चंद्राकडे झेपावले.‘नासा’च्या मंगळ मोहिमेनंतर अर्टिमिस -वन ही सर्वांत महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. ‘नासा’ याद्वारे ओरायन अंतराळयान चंद्रावर उतरविणार आहे. हे यान २६ दिवस चंद्राच्या कक्षेत मुक्काम करून पुन्हा पृथ्वीवर परतणार आहे. फ्लोरिडातील केनेडी अवकाश केंद्राच्या ३९बी या तळावरून स्पेस लाँच सिस्टिम रॉकेट (एसएलएस) आणि ओरायन यान यांचे प्रथमच एकत्रितपणे प्रक्षेपण करण्यात आले. ‘अर्टिमिस-वन’चा हा तिसरा प्रयत्न होता. याआधी दोन वेळा इंधन गळतीमुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते.