Cotton Market : आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस तेजीत !

in #har2 years ago

agrowon_import_news-story_cover-images_1kapus_20kharedi_3.jpeg
पुणेः देशातील कापूस हंगाम (Cotton Season) सुरु होऊन आता चार महिने झाले. पहिल्या तीन महिन्यांमध्ये दरात चढ उतार पाहायला मिळाले. मात्र मागील एक महिन्यामध्ये कापूस दर (Cotton Rate) दबावात आहेत.

मात्र दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) दरात तेजी आहे. विशेष म्हणजे सध्या देशातील कापूस दर आंतरराष्ट्रीय बाजारातील दरापेक्षा (International Cotton Rate) कमी आहेत.

देशात कापसाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कापसाची विक्रीही कमी केली. दीड लाख गाठींच्या दरम्यान पोचलेली बाजारातील आवक पुन्हा एक लाख गाठींच्या दरम्यान पोचली.तर दुसरीकडे वायदेही सुरु होणार आहेत. मात्र तरीही देशातील कापूस दर दबावातच आहेत. आज कापसाचे सरासरी दर ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते.

तर रुईचे भाव आजही सरासरी ६२ हजार रुपये प्रतिखंडीच्या दरम्यान होते. क्विंटलमध्ये रुईचा भाव १७ हजार ४१५ रुपये होतो.आंतरराष्ट्रीय बाजारात रुईचे दर मात्र आजही जास्त होते. काॅटलूक एक इंडेक्स १०१.३५ सेंट प्रतिपाऊंडवर होते.

रुपयात सांगायचं झालं तर हा भाव १९ हजार ९३० रुपये प्रतिक्विंटल होतो. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारातील रुईचे प्रत्यक्ष खरेदीचे दर देशातील दरापेक्षा जास्त आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील वायद्यांचा विचार करता, आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत सीबाॅटवरील वायदे ८५.७७ सेंट प्रतिपाऊंडवर होते. रुपयात वायद्यांचा हा भाव १५ हजार ५४० रुपये होतो.

Also read:
Cotton Rate : कापूस उत्पादक दरवाढीच्‍या प्रतीक्षेत
रुपयाचे अवमुल्यण झाल्याचा फायदा

डाॅलरच्या तुलनेत रुपयाचं अवमुल्यान झालं. एक डाॅलर ८२.१७ रुपयांवर होता. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस आणखी महाग झाला. याचा फायदा देशातील कापसाला मिळू शकतो. आधीच देशात कापसाचे दर नरमले आहेत.

त्यातच डाॅलर मजबूत झाल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कापूस आणखी स्वस्त झाला. यामुळं देशातून कापूस निर्यातीला आणखी बळ मिळेल.

दरवाढीचा अंदाज

सध्या देशात कापूस दर दबावात असले तरी पुढील काळात कापसाचे भाव सुधारण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील सुधारणा आणि देशातून वाढणारी निर्यात यामुळं कापूस दर वाढू शकतात.

कापसाची सरासरी भावपातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.