बाबा रामदेव यांची कंपनी देणार.

in #har2 years ago

baba-ramdev-18_202104594637.jpgबाबा रामदेव यांची कंपनी देणार डिविडंट, तारीख ठरली; शेअरनं दिला ३९००० टक्के रिटर्न
अलीकडेच पतंजली फूड्सचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता.बाबा रामदेव यांची एकमेव सूचीबद्ध कंपनी पतंजली फूड्स लिमिटेड पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांना डिविडेंट देणार आहे. अलीकडेच, कंपनीच्या संचालक मंडळाने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर 5 रुपये डिविडेंट जाहीर केला होता. त्याची रेकॉर्ड डेट 26 सप्टेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. त्याच वेळी, एक्स-डिव्हिडेंटची तारीख 23 सप्टेंबर असेल. 24 आणि 25 सप्टेंबर रोजी साप्ताहिक सुट्टीमुळे शेअर बाजार बंद राहणार आहे.
अलीकडेच पतंजली फूड्सचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. यामुळे कंपनीच्या बाजार भांडवलाने 50,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,415 रुपये आहे. मात्र, आता शेअरमध्येही नफा-वसुली होताना दिसत आहे. आठवड्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा स्टॉक BSE वर 1,338.45 रुपयांवर बंद झाला.

गेल्या तीन वर्षांत बाबा रामदेव यांच्या कंपनीचा शेअर बीएसईवर 3.54 रुपयांवरून 1393 रुपयांपर्यंत वाढला आहे. या अल्प कालावधीत गुंतवणूकदारांना 39,250 टक्क्यांपर्यंत जबरदस्त परतावा मिळाला आहे.

कायआहेभविष्यातीलयोजनापतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांच्या मते, येत्या पाच ते सात वर्षांत समूहाचा व्यवसाय अडीच पटीने वाढून एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. तर दुसरीकडे बाबा रामदेव यांच्या चार कंपन्यांचे आयपीओदेखील येणार आहेत. येत्या काही वर्षांमध्ये आपला समूह पाच लाख लोकांना रोजगार देणार असल्याचा दावाही त्यांनी केला. पतंजली समुहाचा सध्याचा व्यवसाय 40 हजार कोटी रूपयांचा आहे.