निवृत्ती नंतरचे जीवन*

in #har2 years ago

निवृत्ती नंतरचे जीवन

!! पहाटे उठावे स्वतः चहा करावा !!
!! झोप मोडेल असा आवाज नसावा !!
!! प्राणायम करावा योग साधावा !!
!! हाडे मोडतील इतपत तो नसावा !!
!! फिरायला जावे प्रमाणात असावे !!
!! सोबत मोबाईल खिशात असावा !!
!! पडाल कोठे तर नक्की सापडाल !!
!! आंघोळीला तुमचा नंबर शेवटचा !!
!! न रागावता गोड मानुन घ्यावा !!
!! किराणा भाजी पोस्ट बँक !!
!! फिरणे समजुन आनंद घ्यावा !!
!! ज्येष्ठ मंडळीचा कट्टा असावा !!
!! पण त्यात कुठला वाद नसावा !!
!! मनमुराद गप्पांचा आनंद घ्यावा !!
!! लिहीणे वाचणे वाजवणे गाणे !!
!! एखादा तरी छंद नक्की असावा !!
!! मी कोणी मोठा होतो हे विसरा !!
!! मोठेपणाची झुल खुंटीवर ठेवा !!
!! मित्रमंडळी सगे सोयरे नातीगोती !!
!! लक्षात ठेवा हीच कामाला येती !!
!! आता काय राहलयं ? म्हणू नका !!
!! कुणाला उपदेश करत सुटू नका !!
!! पर्यटन चित्रपट नाटक !!
!! राहुन गेले असेल तर उरका !!
!! पत्नीला सोबत घ्या विसरु नका !!
!! प्रकृती आणि पैसा येती कामा !!
!! या दोघाना सांभाळून ठेवा !!
!! संध्याछाया भिववती हृदया !!
हे विसरण्याची साधावी
किमया!!

!! सर्व निवृतांना हार्दिक शुभेच्छा !! 😌🙏