यवतमाळातील शासकीय विश्रामगृहाला लागली गळती

in #government2 years ago

IMG-20220625-WA0023.jpg

यवतमाळ : व्हिआयपीसह राजकीय पुढा-यांसह वरिष्ठ अधिका-यांचे सरबराईसाठी रेस्ट हाउसचा वापर केला जातो. मात्र या रेस्ट हाउसला गळती लागली आहे. पावसाच्या हलक्या सरी आल्या तरी रेस्ट हाउसमध्ये गळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रेस्ट हाउसच्या देखभाल दुरुस्तीवर बांधकाम विभागाकडून दरवर्षी लाखो रुपयाचा खर्च करण्यात येतो. त्यानंतरही रेस्ट हाउस गळत असल्याचे बांधकाम विभागाच्या कारभारावर संशय व्यक्त होत आहे. रेस्ट हाउस म्हटल की, त्या ठिकाणी शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, पुढारी, मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रेलचेल असते. त्या ठिकाणी त्यांच्या भोजनासह आरामाची व्यवस्था करण्यात येते. व्हिव्हिआयपी व व्हिआयपीची या ठिकाणी येत असतात. त्यामुळे शासकीय विश्राम गृह (रेस्ट हाउस) ची रंगरंगोटी, टागडुजी व अन्य देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येते. त्यासाठी दरवर्षी लाखों रुपयांचा खर्च करण्यात येतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शासकीय कार्यालयातील दुरुस्ती करणे क्रमप्राप्त आहे. मात्र बांधकाम विभागाच्या अधिका-यांच्या दुर्लक्षीत पणामुळे यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहाला गळती लागल्याचे दिसुन येत आहे. एवढेच नव्हे तर त्या शासकीय शासकीय विश्रामगृहावर स्लॅबला गळती लागल्याने सार्वजनिक बांधकामाच्या ताब्यात असलेल्या या शासकीय वस्तीगृहाच्या बांधकामाबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून या परिसरातील तीनही विश्रामगृहाच्या दुरुस्तीसाठी तसेच सुशोभिकरण करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले आहे. मात्र दर्शनी भागाचे सुशोभिकरण तर आत मध्ये दयनीय अवस्था अशी परिस्थिती या शासकीय विश्राम गृहाची झालेली आहे. यामुळे तेथील पत्रकार परिषदा विविध संघटना राजकीय पक्षांच्या बैठकांचा खोळंबा झाला. यापूर्वी शासकीय विश्रामगृहाला मागील पावसाळ्यात गळतीचा सामना करावा लागला होता. तेव्हापासून या मुख्य इमारतीवर कोणीही दखल न घेतल्याने त्या विश्रामगृहाच्या स्लॅबला पाणी साचले जात असून या संबंधित बांधकामाच्या कंत्राटदारावर तसेच तत्कालीन अभियंत्याच्या कामकाजाची चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.
IMG-20220625-WA0022.jpg
IMG-20220625-WA0021.jpg
IMG-20220625-WA0020.jpg