गोंडवाना गणतंत्र पार्टी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ची निवडणूक लढनारं

in #gondwana2 years ago

IMG-20220614-WA0024.jpg

गोंडवाना गणतंत्र पार्टी ही सामाजिक समन्वय साधणारी पार्टी आहे यात गरीब, शोषित, शेतकरी शेतमजूर, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला सत्तेत सहभागी करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना सक्षम करण्यासाठी जाती जमाती आणि मागासवर्गीयांच्या विकासासाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी चे वैशिष्ट्य आहे म्हणून गडगंज संपत्तीच्या सत्तापिपासू राजकीय पार्टी च्या नेतृत्वापासुन सावध राहणे आवश्यक आहे.

जिल्ह्यात काही सामाजिक संघटना आहे आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या उदेशाषी समविचारी आहे , वरिष्ठांशी राजकीय रणनिती वर बोलनी चालू आहे म्हणून समविचारी संघटना ला सोबत घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढायला हरकत नाही असे मत मा.बळवंतराव मडावी राज्य कार्याध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनी सहविचार सभेत व्यक्त केले आहे या बैठकीला मा.विजयाताई रोहणकर जिल्हा अध्यक्ष ( महिला ) गोंडवाना गणतंत्र पार्टी मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा निकम साहेब कळंब मा. विठ्ठल भाऊ धुर्वे तालुका अध्यक्ष राळेगाव हणुमान टेकाम पात्रड विनोद भाऊ पराते राळेगाव नितीन ठाकरे उपस्थित होते.