घुई गावातील अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा एल्गार

in #ghui2 years ago

IMG-20220705-WA0032.jpg

पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

यवतमाळ प्रतिनिधी दि 4 जुलै -: लाडखेड पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या घुई गावातील अवैध दारू विक्रीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले असून गावातील ग्रामस्थांचे दारू पिण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे गावातील भांडण-तंटे,घरगुती कलह तसेच आत्महत्या करण्याचे प्रयत्न केल्या जात आहे.दारूच्या वाढत्या अड्डयांमुळे घुई गावातील शांतता भंग पावत आहे.त्यामुळे महिला व नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.याबाबत पुर्वी तक्रारी करूनही प्रशासन दारूकडे लक्ष देत नसल्याने अनेक कुटुंबे मेटाकुटीला आली आहेत.विशेष म्हणजे लाडखेड पोलीस स्टेशनचे बीट जमादार मोरेश्वर सावदे हे अवैध दारू विक्रेत्याकडून हप्ता घेत असल्यामुळे यांची त्या पोलीस स्टेशन मधून हकालपट्टी करावी, हप्ते देत असल्याने विक्रेत्यानां पोलिसांची भीती उरली नसल्याने गावातील दारू विक्रेते अवैध विक्रेत्यांची दिवसेंदिवस हिम्मत वाढत असून ते सर्रास अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत आहे.गावात दारू मिळत असल्याने लहान लहान मुले सुद्धा दारू पिण्याच्या व्यसनाधीन झाले आहे.करिता संबंधित दारू विक्रेत्यावर कायदेशीर करावी व दारू विक्रेत्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करून प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा यासाठी घुई गावातील महिलांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले.यावेळी निवेदन देताना साधना जाधव,नर्मदा आडे,शालू राठोड, कमला आडे,सरस्वती जाधव,निर्मला राठोड,पार्वती राठोड,सुमन राठोड,देवकी राठोड,सवित्रा राठोड इत्यादी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.