पुणेकरांना सर्दी, खोकल्याचा ‘ताप’; कोरोना रुग्णसंख्याही वाढली

in #gaul2 years ago

पुणे - पुणेकरांनो, स्वतःची प्रकृती सांभाळा. कारण शहरात पुन्हा ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यातील बहुतांश रुग्णांना कोरोनानिदान होत नाही, हे दिलासादायक आहे. मात्र, आता परत मास्कचा वापर करा, गर्दीत जाणे टाळा आणि ताप आल्यास तातडीने उपचार घ्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, शहरात गेल्या मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत सौम्य वाढ झाल्याचे