बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स दाखवतील चमक?

in #gaul2 years ago

सोमवारी बाजार घसरणीसह बंद झाला. RBI मॉनेटरी पॉलिसी कमिटीची तीन दिवसीय बैठक सोमवारपासून सुरू झाल्याने गुंतवणूकदार सावध दिसले. याशिवाय आशियाई बाजारातून येणारे संमिश्र संकेत, कच्च्या तेलाच्या किमती आणि कोविड प्रकरणांमध्ये झालेली वाढ यामुळेही सोमवारी दबाव दिसून आला. शेवटी सेन्सेक्स 93.91 अंकांनी म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घसरून 55,675.32 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 14.75 अंकांनी म्हणजेच 0.09 टक्क्यांनी घसरून 16,569.55 वर बंद झाला.येत्या काळात देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत अस्थिरता सुरू राहू शकते असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 8 जून रोजी येणार्‍या RBI MPC च्या निर्णयांवर बाजाराचे लक्ष आहे. ECB ची बैठक दुसऱ्या दिवशी म्हणजेच 09 तारखेला होणार आहे. त्यानंतर, 10 जून रोजी, यूएस चलनवाढीचा डेटा येईल, ज्यावर बाजाराची नजर असेल.

हेही वाचा: पीएफचा व्याजदर घटला म्हणून काय झालं? या ५ योजना देतील उत्तम परतावा

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?क्रेडिट पॉलिसी जाहीर होण्यापूर्वी बाजार सावध दिसत असल्याचे कोटक सिक्युरिटीज लिमिटेडचे श्रीकांत चौहान म्हणाले. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार रिअल्टीसारख्या व्याज-संवेदनशील शेअर्समधून बाहेर पडताना दिसत आहेत. तांत्रिक दृष्टिकोनातून विचार केल्यास, निफ्टीला 16450 च्या जवळ सपोर्ट मिळत असल्याचे दिसून आले पण तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. डे ट्रेडर्ससाठी 16500 लेव्हल खूप महत्त्वाची आहे. निफ्टी त्याच्या वर गेला तर 16650-16750 ची पातळी दिसू शकते. दुसरीकडे, जर निफ्टी खाली घसरला तर तो 16,400-16,350 च्या आसपास जाताना पाहू शकतो.सोमवारी बाजार मंदावला होता आणि मिश्र जागतिक संकेतांमुळे तो जवळजवळ सपाट बंद झाल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि MPC बैठकीपूर्वी सावधगिरीचा बाजारावर परिणाम दिसून येत आहे. इंडेक्समध्ये पुढे कंसोलिडेशनचे संकेत दिसत आहेत.
हेही वाचा: RBIने repo rate वाढवल्यास तुमचा EMI किती वाढणार ?

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?बजाज ऑटो (BAJAJAUTO)जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)टाटा कंझ्युमर (TATACONSUM)ओएनजीसी (ONGC)अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)ए यू बँक (AUBANK)टाटा पॉवर (TATAPOWER)भारत इलेक्ट्रीकल लिमिटेड (BEL)नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Web Title: Share Market Pre Analysis 7 June 2022
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.
टॅग्स :Share MarketSensex TodayNiftyArthavishwasensexBSE Sensex
HomeArthavishwaShare Market Pre Analysis 7 June 2022 Ndj97