देशातील कोट्यवधी जनतेच्या खात्यात सरकार जमा करणार पैसे! दर महिन्याला 5000 रुपये, लवकर करा नोंदणी

in #ganpati2 years ago

केंद्र सरकार (Central Government) तुमच्या खात्यात 15 लाख रुपये कधी जमा करणार हे काही आम्ही सांगू शकत नाही. पण तुमच्या आयुष्याच्या संध्याकाळी केंद्र सरकारच्याच एका योजनेतून औषधपाण्याची सोय होऊ शकते. त्याविषयी आपण माहिती घेऊयात. केंद्र सरकारकडून अनेक विशेष योजना चालवल्या जातात. अगदी अल्प गुंतवणुकीत (Small Investment) तुम्हाला योजनेतंर्गत मोठी रक्कम मिळते. अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) ही पूर्वी असंघटीत कामगारांसाठी (unorganized Workers) सरकारने सुरु केली होती. पण तिची लोकप्रियता पाहता ही योजना आता सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. तुम्हीही या योजनेत रक्कम गुंतवू शकता. या योजनेत आता गुंतवणूक केल्यास वृद्धापकाळात चांगली रक्कम हाती येऊ शकते. दरमहा केंद्र सरकार गुंतवणुकीच्या आधारे रक्कम जमा करते. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी कष्ट उपासण्याची आणि उपाशी राहण्याची वेळ येत नाही.Atal-Pension-Yojana.jpg