MS Dhoni ने शोधलेल्या ‘या’ बॅट्समनने महाराष्ट्राकडून ठोकलं दणदणीत शतक, फक्त 17 चेंडूत ठोकल्या 78 धावा
मुंबई: एमएस धोनीने (MS Dhoni) अनेक खेळाडूंना घडवलं. धोनीने ज्या खेळाडूंना शोधलं, त्यांनी नेहमीच सर्वोत्तम प्रदर्शनाचा प्रयत्न केला. या खेळाडूंनी स्वत:ची एक ओळख बनवली. अशाच खेळाडूंपैकी एक आहे ऋतुराज गायकवाड. टीम इंडियाकडून (Team India) खेळताना ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) अजूनही सूर गवसलेला नाही. पण अन्य टुर्नामेंटमध्ये या खेळाडूने नेहमीच दमदार प्रदर्शन केलय.
सर्विसेज विरुद्ध अप्रतिम इनिंग
हा खेळाडू आऊट ऑफ फॉर्म आहे, असं वाटतच नाही. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ऋतुराज गायकवाडने तुफानी शतक ठोकलं. आयपीएलमध्ये धोनीने ऋतुराज गायकवाडला संधी दिली. महाराष्ट्राकडून सर्विसेज विरुद्ध ऋतुराज गायकवाड एक अप्रतिम इनिंग खेळला.