ट्रेनमध्ये विकत घेतलेल्या समोशामधून निघाला ‘पिवळा कागद’; प्रवाशाच्या तक्रारीवर IRCTC

in #ganpati2 years ago

रेल्वेच्या प्रवासादरम्यान आपण काही ना काही खायला नक्कीच घेतो. पण प्रत्येकवेळीच हे पदार्थ चांगले असतीलच असे नाही. आयआरसीटीसीकडून देण्यात येणारे पदार्थ चांगले नसतात अशा अनेक तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या आहेत. नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे. मुंबईहून लखनऊपर्यंत ट्रेनने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने एका समोशाचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने काय म्हटलंय पाहुयात.

अजी कुमार या ट्विटर युजरने आपल्या अकाउंटवर एका समोशाचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अजीने त्याच्याबरोबर घडलेला प्रकार स्पष्ट केला आहे. अजीच्या पोस्टनुसार, मुंबई ते लखनऊ प्रवासादरम्यान त्याने आयआरसीटीसी पॅन्ट्रीमधून एक सामोसा विकत घेतला होता. मात्र यावेळी त्याच्याबरोबर एक विचित्र गोष्ट घडली. या समोशामध्ये त्याला एक पिवळा कागद सापडला. आपण अजीने शेअर केलेल्या फोटोमध्ये हा कागद पाहू शकतो.WhatsApp-Image-2022-10-10-at-7.04.36-PM.jpeg

Sort:  

wortheum Like, comment and follow the news of all the friends connected in me and go ahead