सासूबाईंसोबत शेतात कांदे लावतेय फॉरिनची सुनबाई.. शेतात काम करणाऱ्या सासू- सुनेचा व्हायरल

in #ganpati2 years ago

सासूबाईंसोबत शेतात कांदे लावतेय फॉरिनची सुनबाई.. शेतात काम करणाऱ्या सासू- सुनेचा व्हायरल व्हिडिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2022 5:31 PM

Viral Video of a Foreigner Daughter-in-law: इथे शहरात राहणाऱ्या मुली खेडेगावात जाऊन शेतात काम करायला नाही म्हणतात.. आणि त्याच वेळी ही जर्मनीची (Germany) तरुणी बघा कशी सराईतपणे शेतात काम करतेय.

सासूबाईंसोबत शेतात कांदे लावतेय फॉरिनची सुनबाई.. शेतात काम करणाऱ्या सासू- सुनेचा व्हायरल व्हिडिओ

ठळक मुद्दे
पंजाबी ड्रेस, कपाळावर टिकली, सिंधूर, गळ्यात मंगळसूत्र अशा भारतीय वेशभुषेत दिसणाऱ्या ज्युलीने नेटिझन्सची मने जिंकून घेतली आहे.
परदेशी लोकांचं वागणं, त्यांचं चालणं- बोलणं, लाईफस्टाईल, खाद्यपदार्थ यांची भुरळ जशी आपल्याकडच्या लोकांना पडलेली असते, तशाच आपल्या काही गोष्टीही तिथल्या लोकांना प्रचंड आवडतात. ही फॉरेनहून आलेली सुनबाईही त्याच प्रकारातली आहे. तिला म्हणे भारतीय लोक, इथली एकत्र कुटूंबपद्धती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेडेगावातलं शांत, निसर्गाच्या सान्निध्यातलं वास्तव्य तिला अतिशय प्रिय आहे. म्हणूनच तर सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Viral Video of a Foreigner Daughter-in-law Working in a Farm)झाली आहे या परदेशी सुनबाईंची न्यारीच गोष्ट..whatsapp-image-2022-11-09-at-5.09.29-pm_202211907760.jpeg