शिंदे गटाला मिळालेल्या नावावर ‘या’ ठाकरेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले…

in #ganpati2 years ago

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला आणि एकनाथ शिंदे गटाला वेगवेगळं नाव मिळालं. निवडणूक चिन्हही जाहीर झालं. त्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे नातू आणि जयदेव ठाकरे यांचे सुपुत्र जयदीप ठाकरे (Jaydeep Thackeray) यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘नाव जरी त्यांच्याकडे असलं, तरी रक्त आमच्याकडे आहे’ अशा शब्दांत जयदीप ठाकरे यांनी या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या दोन्ही गटांचं नाव आणि चिन्हाबाबत टीव्ही 9 मराठीने जयदीप ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी ते बोलत होते.Uddhav-Thackeray-Eknath-Shinde-Jaydeep-Thackeray.jpg

Sort:  

wortheum Like, comment and follow the news of all the friends connected in me and go ahead