कबड्डी..कबड्डी..डोक्यावर पदर आणि गावरान हिसका, पाहा आयाबायांच्या कबड्डीचा जबरदस्त सामना

in #ganpati2 years ago

पदर डोक्यावर घेऊन तो कंबरेशी खोचून अतिशय उत्साहाने स्पर्धेत सहभागी झालेल्या या महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
हा व्हिडिओ आतापर्यंत ३ लाखांहून अधिक जणांनी पाहिला असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही आल्या आहेत.
कबड्डी म्हटले की टिशर्ट आणि शॉर्ट पँट घातलेले तरुण किंवा तरुणी असे चित्र सामान्यपणे आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. मैदानात कबड्डी...कबड्डीचा घोष आणि दुसरीकडे स्पर्धेची इर्शा असे चित्र पाहायला मिळते. लहानपणापासून शाळेत खेळत असलेला हा खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचला आहे. विशेष म्हणजे महिलाही आता यामध्ये मागे नाहीत. प्रसंगी साडी नेसून डोक्यावर पदर घेत महिला कबड्डीच्या मैदानात उतरतात आणि त्यांचा हा सामना जबरदस्त रंगतो. विशेष म्हणजे त्यांच्या या सामन्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले असून त्यावर बरीच चर्चा सुरू आहे (Women Kabaddi Game Wearing Saree Chhattisgarh Olympic Viral Video). 01d48bab-2488-45f7-b893-00db6aaae48f_202210894181.jpg

Sort:  

wortheum Like, comment and follow the news of all the friends connected in me and go ahead