पालिकेचे लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात, लाचखोरीचा फंडा ऐकून आश्चर्य वाटेल…

in #ganpati2 years ago

नाशिक महानगर पालिकेच्या (NMC) दोन कर्मचाऱ्यांनी पैसे कमविण्याचा नवा फंडा आखला होता. पण, त्या आधीच ते दोघेही लाचलुचपत अधिकाऱ्यांच्या (ACB) सापळ्यात अडकले आहे. पाच हजार रुपये दर महिन्याला द्या, कामावर न येता पूर्ण पगार घ्या अशी योजनाच नाशिक महानगर पालिकेच्या दोन पालिका कर्मचाऱ्यांनी आखली होती. नाशिकच्या (Nashik) नाशिकरोड विभागीय कार्यालयातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाच हजार रुपयाची मागणी पालिकेतील एका सफाई कर्मचाऱ्याकडे करण्यात आली होती. त्याने ही तक्रार थेट एसीबीकडे केली होती. याची दखल एसीबीने घेत सापळा रचला होता. त्यात एसीबीच्या पथकाला यश आले असून स्वछता निरीक्षक राजू निरभवणे आणि मनपा कर्मचारी बाळू जाधव असे लाचखोर संशयितांची नावे आहेत.acb-nrd.jpg

Sort:  

wortheum Like, comment and follow the news of all the friends connected in me and go ahead