5G launch updates : स्वस्त की महाग? ५ जीचा तुम्हाआम्हाला काय फायदा

in #five2 years ago

Saturday, October 1, 2022
AMP

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

5G launch updates : स्वस्त की महाग? ५ जीचा तुम्हाआम्हाला काय फायदा?
Published on : 1 October 2022, 7:25 am

By
कोमल जाधव

भारतात इंटरनेट सुविधांच्या ५ जी पर्वाचा शुभारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतील इंडिया मोबाईल काँग्रेस प्रदर्शनात शुभारंभ करण्यात आला आहे. आजपासून भारतातील काही निवडक १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरू झाली आहे. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेस या प्रदर्शनात मोदींनी ५जी सेवेचं उद्घाटन केलं.

भारतात इंटरनेट सुविधांच्या ५ जी पर्वाचा शुभारंभ झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीतील इंडिया मोबाईल काँग्रेस प्रदर्शनात शुभारंभ करण्यात आला आहे. पण आता याच ५ जी संदर्भात तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत

5 जी म्हणजे काय?5 जी हे इंटरनेट सेवेतील Fifth Generation असेल. ५ जीचं नेटवर्क याआधीच्या २जी, ३जी, ४जी पेक्षा वेगवान असेल. म्हणजे ५ जीचा स्पीड ४ जीपेक्षा १० पट अधिक असेल.आता ५ जी आलं म्हणजे नवं सिम कार्ड घ्यावं लागेल का? तर, याचं तूर्तास उत्तर नाही असं आहे. कारण, टेलिकॉम कंपन्यांनीही तूर्तास ४ जी कार्ड अपग्रेड करुन ५ जी करण्याचं ठरवलंय. त्यामुळे आतातरी लगेच आपल्याला ५ जीचं नवं सिम कार्ड घ्यावं लागणार नाही.परंतु ५ जी इंटरनेट सेवा वापरण्यासाठी आपल्याला ५ जी मोबाईल असणं गरजेचं आहे. पण, आपल्याला माहिती असेलच की, देशात ५ जी सुविधा येण्याआधीच मोबाईल कंपन्यांनी ५ जी मोबाईल बाजारात आणले होते. त्यामुळे ज्यांच्याकडे ५ जी मोबाईल असतील त्यांना ५ जी इंटरनेट सेवा वापरण्यात येणार आहे.५ जीचा स्पीड कसा असेल?आज ५ जी सेवेचा शुभारंभ होण्याआधी टेलिकॉम कंपन्यांनी 5G स्पीडबाबत चाचण्या केल्या आहेत. ज्यात एअरटेलने 5Gच्या चाचणीत 3000 एमबीपीएस पर्यंतचा वेग मिळवला होता. तर व्हीआयनेटवर्क म्हणजेच (Vodafone-Idea) ला 3.7 GBPS पर्यंत स्पीड गाठता आला होता. तर, जिओला 5G नेटवर्कच्या टेस्टमध्ये 1000 एमबीपीएस पर्यंतचा स्पीड मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ५ जी सेवांवरुन पुन्हा एकदा टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा रंगणार हेही तेवढंच नक्की.

5G ची किंमत स्वस्त की महाग असेल?तर सध्यातरी याचं उत्तर काहीसं महाग असंच आहे. म्हणजे ५ जीमुळे इंटरनेटचा हायस्पीड असेल, कमी बफरिंग टाईम असेल मग ५ जीचे रिचार्ज ४ जीच्या तुलनेत काहीसे महागडे असतील असं आतातरी कळतंय. रिलायन्स जिओ आणि एअरटेल 4G च्या किंमतीतच 5G इंटरनेट सेवा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर तिकडे सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रम लिलावात मोठी रक्कम गुंतवल्याचं कळतंय. त्यामुळे आता भारतात 5G च्या किंमती नेमक्या किती असतील हे येत्या काही दिवसात कळेलच.

आता ही झाली ५ जीची माहिती, पण या ५ जी सेवेचा तुम्हाआम्हाला कसा फायदा होईल?५ जी सेवेचा तुम्हाआम्हाला कसा फायदा होईल?५ जी स्पीडमुळे ३ तासाचा चित्रपट अवघ्या ३ सेकंदात डाऊनलोड होणारमोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होणारदेशातील ५ जी चे टॉवर वाढणारव्हिडीओ कॉलची क्वालिटी सुधारणारनैसर्गिक आपत्तीत ५ जीचा अधिक उपयोग होणारकॉल ड्रॉपची समस्या संपण्यास मदत होणारइ-लर्निंग क्लासेसची संख्या वाढणारलवकरच घरातील फ्रीज, टीव्ही, माइक्रोव्हेव, ओव्हन, वॉशिंग मशीन, एसीसारख्या घरातील वस्तू इंटरनेटशी जोडल्या जातील५ जीची सेवेचा लाभ आजपासून मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, लखनौ, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता या १३ शहरांमधील नागरिकांना घेता येणार आहे. २०२४ पर्यंत देशातील ७५ टक्के नागरिकांना ५ जी सेवा मिळावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असणार आहे. आज तंत्रज्ञानाच्या इतिहासातलं महत्वाचं पाऊल भारतात पडलंय. ५ जी हे जगानं पाहिलेल्या सर्वात वेगवान तंत्रज्ञानापैकी एक आहे. त्याचा अर्थ आपल्याला इंटरनेट सुविधाही वायुवेगानं मिळतील, अशी शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे ५जी विषयी आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा.bhushan_esakal___2022_08_25T191024_029.pngbhushan_esakal___2022_08_25T191024_029.png