पहिली पत्नी असताना विधवा महिलेशी थाटला संसार

in #first2 years ago

IMG-20220625-WA0018.jpg

पीडित महिलेची सासरच्या मंडळी विरोधात पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

यवतमाळ -: जिल्ह्यातील वणी तालुक्यातील गोकुळ नगर येथे वास्तव्यास असलेल्या शंकर संतोष पोटे वय 30 वर्ष असे दुसऱ्या विधवा महिलेशी विवाह करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
पीडित महिला ही कळंब तालुक्यातील असून तिचा विवाह दिनांक 28 मार्च 2019 ला हिंदू पद्धतीने शंकर संतोष पोटे याच्यासोबत झाला.या नंतर काही दिवस ते गुण्यागोविंदाने संसार करत होते.मात्र त्यांच्या संसाराला कुणाची लागली नजर काय कोण जाणे,नंतर पत्नी पुजा पोटे हिला माहेर वरून एक लाख रुपये घेऊन ये अन्यथा तुला माझ्या घरात ठेवणार नाही अशा धमक्या देऊन मारहाण करायला लागला.यामध्ये त्याला त्याचे वडील संतोष पोटे वय 50 वर्ष तसेच इतरांचाही संपूर्ण पाठिंबा होता.माहेर वरून पैसे न आणल्याच्या कारणावरून त्याने सतत पत्नीला मारहाण करून मानसिक व शारीरिक इजा पोहोचवली एवढ्यावरच ते थांबले नाही तर माहेर वरून पैसे न आणल्यास दुसरा विवाह करून सतत धमकी देत होते.अशातच काही दिवसांनी कामधंद्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे घेऊन गेले व त्या ठिकाणी काम सुरु केले काही दिवसातच पुन्हा त्या ठिकाणीहुन वाद करुन पत्नीच्या माहेरी कळंब येथे आणुन एक लाख रुपये आणण्याची मागणी केली नाही दिल्यास तर तुला मारून टाकील अशी धमकी देऊन परत कळंब वरून सुद्धा निघून गेला.यानंतर त्याने एका विधवा महिलेशी विवाह केल्याची माहिती संबंधित पीडित महिलेस कळाली यावरून तिने हिंदू पद्धतीने विवाह केल्यानंतर सुद्धा त्याने कुठल्याही प्रकारे फारकत न घेता परस्पर विधवा महिलेशी नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे संसार थाटला. याविरोधात पीडित महिलेने 23 जून 2022 रोजी कळंब पोलीस स्टेशनला तक्रार दिली मात्र कळंब पोलीस स्टेशन कडून कुठलीही दखल न घेतल्यामुळे त्या पीडित महिलेने यवतमाळ गाठून थेट पोलिस अधीक्षक यांना तक्रार दिली असून आरोपी शंकर संतोष पोटे,संतोष पोटे,मारोती संतोष पोटे,वनवाशे आत्ममंगल रा.राजु नगर ता.हिंगणा जि.नागपुर यांचेवर अत्याचार प्रतिबंधक व घरेलू हिंसा कायदा तथा हुंडाविरोधी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी तक्रारीतून संबंधित महिलेने पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.