बनावट एफडीआर प्रकरणी जिल्हा बँकेच्या संचालकावर गुन्हा दाखल

in #filed2 years ago

fir.jpg

यवतमाळ- जि. प. चा एक कंत्राट मिळवण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला हाताशी धरुन बनावट एफडीआर (सुरक्षा ठेव) तयार करुन घेणाऱ्या बँकेच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजीव येल्टीवार रा. दिग्रस (पाटण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकाचे नाव आहे. जि. प. च्या कामाचे कंत्राट मिळवण्यासाठी संबंधित संचालकाने बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला हाताशी धरुन बनावट एफडीआर तयार केले होते. जि. प. बांधकाम विभाग क्रमांक १ यांच्या निविदा प्रकरणात अतिरिक्त सुरक्षा रक्कम म्हणून जिल्हा बँकेच्या पाटण शाखेतील १८ लाख १० हजार रुपयांच्या सुरक्षा ठेवीच्या १६ बनावट पावत्या तयार करुन त्या बांधकाम विभागात देण्यात आल्या. ही बाब लक्षात येताच वणीचे आ. संजीव रेड्डी बोदकुलवार यांनी प्रधान सचिवांकडे तक्रार केली होती. त्यानंतर जि. प. बांधकाम विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रमोद राऊत यांनी पाटण पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर सुमारे ४ महिने तपास केल्यानंतर पाटण पोलिसांनी अखेर राजीव येल्टीवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.