मुख्यमंत्र्यांना पळालेल्या आमदारांची तर शेतक-यांना पावसाची प्रतिक्षा

in #farmers2 years ago

IMG-20220625-WA0043.jpg

पावसाअभावी पिक न उगवल्याने बियाण्यांची मदत द्या- सिकंदर शहा

प्रतिनिधी यवतमाळ

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांच्या पळून गेलेल्या आमदारांची तर दुसरीकडे राज्यातील शेतक-यांना दडी मारलेल्या पावसाची प्रतिक्षा आहे. जून महिना संपण्याच्या मार्गावर असतांनाही पाऊस मात्र दडी मारुन बसला आहे. हजारो शेतक-यांनी पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने आता सरकारने शेतक-यांना बियाण्यांची मदत देण्याची मागणी शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी केली आहे.

IMG-20220625-WA0041.jpg

सिकंदर शहा यांनी नुकताच जिल्हयातील काही ग्रामीन भागाचा दौरा केला असता शेतक-यांनी त्यांना आपबिती सुनावली. पर्जन्य विभागाने जुन महिण्यात चांगला पाऊस येणार असल्याचे भाकीत केल्याने शेतक-यांनी सुरवातीलाच सोयाबिन, कापूस तसेच इतर पिकांची पेरणी केली. दुसरीकडे पावसाने मात्र दडी मारल्याने अनेकांचे बियाने जमिनीतच खराब झाले. यानंतर अनेकांनी आता दुबार पेरणी केल्यानंतर पावसाची प्रतिक्षा करीत आहे. सुरुवातीलाच पेरणी केलेल्या तसेच दुबार पेरणी केलेल्या काही शेतक-यांनी ही दुबार पेरणी सुध्दा वाया जाते की काय अशी भीती व्यक्त केली आहे. एकीकडे राज्यातील शेतकरी संकटात असतांना राज्यात मात्र भोंग्यापाठोपाठ आता सत्ता परीवर्तनाची लढाई सुरु आहे. राज्याचे कृषीमंत्री सुध्दा गोवाहटी येथे फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये मुक्कामाला गेले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्वच विभागाचे मंत्री, नेते फक्त सत्ता परीवर्तनाच्या लढाईत उतरले आहे. आमदार सुध्दा गोवाहटी येथे गेल्याने तसेच इतर आमदार याच भानगडीत असल्याने शेतक-यांच्या प्रश्नाकडे बघायला कुणालाच वेळ नाही. उध्दव ठाकरे यांना त्यांच्या पळून गेलेल्या आमदारांची प्रतिक्षा आहे. दुसरीकडे शेतक-यांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे अशी विदारक परीस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. राज्यात सुरुवातीला भोंग्याचे राजकारण तापविण्यात आले त्यापाठोपाठ राज्यसभा तसेच विधाण परीषदेच्या निवडणूकीचे वातावरण तापले आणि आता सत्ता परीवर्तनाचा नंगानाच सुरु झाला आहे. या सर्व परीस्थितीने राज्यातील शेतक-यांची अवस्था मात्र बिकट झाली आहे. शेतक-यांना पिककर्ज मिळाले कि नाही, त्यांच्या पिकविमा उतरला कि नाही, बियाणे अथवा खत त्यांना मिळाले कि नाही यासंदर्भात कुणीच दखल घ्यायला तयार नाही. राजकारण्यांच्या या दुर्लक्षीत धोरणामुळे आता शेतक-यांचा वाली कोण असा प्रश्न सिकंदर शहा यांनी उपस्थित केला आहे.

IMG-20220625-WA0041.jpg

रस्त्यावर उतरण्याचा इशारा

भोंगेबाजी च्या विरोधात शेतक-यांनी मुंबई येथे आंदोलन करुन सरकारवर दबाव आनण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही राज्यातील अस्थिरता संपण्याची शक्यता दिसून येत नाही. सत्ता परीवर्तनाची लढाई सोडून शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यात यावे. पावसाने दडी मारल्याने मोठया प्रमाणात दुबार पेरणीची वेळ शेतक-यांवर आली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांना मोफत बियाणे उपलब्ध करुन देण्यात यावे अन्यथा रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा सिकंदर शहा यांनी दिला आहे.

सिकंदर शहा
अध्यक्ष, शेतकरी वारकरी संघटना

IMG-20220625-WA0041.jpg

  • शेतीच्या बांधावर जाऊन शेतक-यांशी चर्चा करतांना सिकंदर शहा