ठाकरेंचा निरोप घेऊन निकटवर्तीय सूरतला रवाना, एकनाथ शिंदे यांच्या नाराज मुद्द्यावर चर्चा करणार

in #eknathshinde2 years ago

एकनाथ शिंदे यांचं बंड थंड करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हस्तक्षेप केला आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन त्यांचे निकटवर्तीय सूरतकडे रवाना होणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सूरतला जाणार आहेत.

————————————————

खासदार हेमंत गोडसे नाशिकहून मुंबईकडे रवाना, वर्षा बंगल्यावर संध्याकाळी शिवसेना खासदारांची बैठक

नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना झाले आहेत. सायंकाळी शिवसेना खासदारांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना खासदारांची संध्याकाळी बैठक बोलावली असल्याची माहिती नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. मंत्री एकनाथ शिंदे आणि सेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर तातडीने ही बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईतील वर्षा निवासस्थानी बैठक होणार असंल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.
नाशिक मधून खासदार हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना, वर्षा बंगल्यावर बैठक

नाशिक मधून खासदार हेमंत गोडसे मुंबईकडे रवाना, सायंकाळी शिवसेना खासदारांची वर्षा बंगल्यावर बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व शिवसेना खासदारांची संध्याकाळी बैठक बोलावली असल्याची माहिती नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

मंत्री एकनाथ शिंदे आणि सेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर तातडीने ही बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईतील वर्षा निवासस्थानी बैठक होणार असंल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली.
35 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा दावा, काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा अमान्य असल्याची सूत्रांची माहिती

राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. आम्ही शिवसैनिक आहोत आणि अजूनही शिवसेनेसोबतच आहोत, अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहेत.

एकनाथ शिंदे नॉट रिचेबल, ठाण्यातील निष्ठावंतांना 'वर्षा'वरुन फोन, 'वर्षा'वर येण्याचे आदेश

हॉटेल सेंट रेजीसमधून 14 शिवसेना आमदार वर्षा बंगल्याच्या दिशेने रवाना झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक होणार आहे. ठाण्यातील निष्ठावंत शिवसेना पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावरुन मध्यरात्री २ ते ३ वाजता फोन करुन बैठकीसाठी बोलावलं आहे.
महाराष्ट्रात नाराजीनाट्य, दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; अमित शाह जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचले

महाराष्ट्रात नाराजीनाट्य घडलेलं असताना दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शाह दाखल झाले आहेत. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत असल्याने ते देखील नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचतील अशी शक्यता आहे.
वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक, आमदार येण्यास सुरुवात

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आमदार येण्यास सुरुवात झाली आहे. अनिल देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत वर्षावर दाखल झाले आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याचा दावा

शिवसेनेमधील आतापर्यंतच सर्वात मोठं बंड झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याचा दावा केला जात आहे.