ED च्या कचाट्यात शिवसेनेचा आणखी एक नेता, 18 तास चौकशी

in #ed2 years ago

जालना : सक्तवसुली संचलनालय (ED) च्या कचाट्यात शिवसेनेचा आणखी एक नेता सापडल्याचे समजत आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्या जालन्यातील राहत्या घरी ईडीने (ED Raid) सकाळी धाड टाकली. तसेच, ईडीने तब्बल 18 तास अर्जुन खोतकर यांची चौकशी केली. भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी जालना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केल्यानंतर ईडीने अर्जुन खोतकरांच्या घरावर छापा टाकला.रामनगर सहकारी साखर कारखान्यात आर्थिक संबंधकाही दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबादसह जालना आणि नांदेडमधील काही ठिकाणी छापे मारले होते. त्यानंतर जालन्यातील अर्जुन खोतकर यांच्या घरी शुक्रवारी सकाळीच ईडीचं पथक दाखल झाले. 12 जणांच्या या पथकाने घराचे दरवाजे आतून लावून घेत तपासणी सुरु केली. औरंगाबादमधील उद्योजकांच्या माध्यमातून रामनगर सहकारी साखर कारखान्यात आर्थिक संबंध असल्याची तक्रार सोमय्यांनी केली होती. किरीट सोमय्यां यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत अर्जुन खोतकर यांच्यावर गैर व्यवहाराचे आरोप केले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आज अर्जुन खोतकर ईडीने केलेल्या या कारवाई संबंधी माहिती प्रसारमाध्यमांना देणार आहेत.अर्जुन खोतकर हे सध्या जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचीही ईडीकडून तपासणी करण्यात आली. जालन्यात आज सकाळीच या दोन ठिकाणी सक्तवसुली संचलनालयातर्फे धाडी टाकण्यात आल्याने शहरात एकच खळबळ माजली होती.
1.jpg