काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील; अध्यक्ष निवडणुकीतील

in #dipak2 years ago

Mallikarjun-Kharge.jpgमुंबई : काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान वाचविण्याकरिता भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. प्रदेश काँग्रेसच्या प्रतिनिधीसमोर आपली भूमिका मांडताना ही निवडणूक व्यक्तिगत नाही, माझा सामूहिक नेतृत्वावर विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार खरगे यांनी टिळकभवन येथे प्रदेश प्रतिनिधींशी संवाद साधला.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आपण का लढवीत आहोत, त्याची पार्श्वभूमी सांगताना खरगे म्हणाले की, राहुल गांधी यांना अध्यक्ष करावे, अशीच माझी भूमिका होती. मी तशी सोनिया गांधी यांना विनंती केली. परंतु गांधी कुटुंबातील कुणीही अध्यक्ष होणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर काही वरिष्ठ नेत्यांनी माझी भेट घेऊन मला अध्यक्षपदाचे उमेदवार होण्याची विनंती केली. मी ती मान्य केली. या देशात काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी मी काम करणार आहे, तसेच उदयपूर घोषणाप