Sanjay Raut : आई मी नक्कीच परत येईन...संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र

in #digras2 years ago

!!प्रिय आई,जय महाराष्ट्र!खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज 'सामना'साठी अग्रलेख लिहीत होतो, स्तंभलिहीत होतो, पण दौऱ्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजच भेटत होतो. दौऱ्यावर असताना सकाळ-संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचे राहून गेले. आता हे पत्रलिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली.आताच माझी ईडी कोठही संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरीलबाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आलाय.रविवारी (१ ऑगस्ट) 'ईही'चे अधिकारी घरी घुसले तेव्हा तू मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखालीखंबीरपणे बसून होतीस. तुझ्या खोलीची व देवघराची, तसेच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्याडब्यांची झडती घेतली तेव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस, हा प्रसंग