Pune Traffic : वाहतूक कोंडीत अडकले मर्सिडीजचे CEO; गाडी सोडून केला रिक्षाने प्रवास

in #digras2 years ago

Mercedes Benz India CEO Schwenk Stuck In Pune Traffic : मर्सिडीज-बेंझ इंडियाचे एमडी आणि सीईओ मार्टिन श्वेंक यांची एक इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. पुण्यातील वाहतूक कोडींचा फटका कुणाला कसा बसेल काही सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना या वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. त्यानंतर आता मर्सिडीज बेंझचे सीईओ मार्टिन श्वेंक यांना याचा फटका बसला आहे. याबाबत त्यांनी इन्टाग्रामवर पोस्ट केली आहे. वाहतूक कोंडीनंतर श्वेंक यांनी गाडीतून बाहेर पडत रिक्षाने प्रवास केला. सध्या ही पोस्ट शहरात चर्चेचा विषय बनली आहे.