EMI महागणार : RBI कडून रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ

in #digras2 years ago

RBI Hike Repo Rate : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आज त्यांच्या चलनविषयक धोरण समितीचे (MPC Meeting) निर्णय जाहीर केले आहेत. यामध्ये रेपो दरात 0.50 टक्के बेसिस पॉइंट्स्ची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. यामुळे ग्राहकांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार असून, सामान्यांचे आर्थिक गणित बिघणार आहे. वाढीच्या निर्णयानंतर रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर आला आहे. जो पूर्वी 5.40 टक्क्यांवर होता. रेपो दरातील वाढ तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार असल्याचेही दास यांनी म्हटले आहे. याआधी ऑगस्टमध्ये आरबीआयने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ केली होती.