मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाषण; शिवसेना ठाकरे गटाच्या ७ जणांवर गुन्हा दाखल

in #digras2 years ago

ठाणे : ठाण्यातील महाप्रबोधिनी यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये महाप्रबोधिनी यात्रेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपावरून शिवसेना शिंदे गटाचे दत्ताराम ऊर्फ बाळा सखाराम गवस यांनी ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव, खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, ठाणे महिला आघाडी अध्यक्षा अनिता बिजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, ठाणे शहरप्रमुख केदार दिघे, नगरसेवक नरेश मणेरा, सुभाष भोईर, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे व सूत्रसंचालक सचिन चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.