Pune Ganesh Visarjan: निर्बंधमुक्त ते विक्रमी वेळेची नोंद; यंदाच्या विसर्जनाची खास वैशिष्ट्ये

in #digras2 years ago

पुणे : दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त गणेशोत्सव राज्यभर साजरा झाला. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची घोषणा केली होती. त्यानंतर पुण्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव पार पडला. मास्कमुक्त असलेला हा पहिलाच मोठा कार्यक्रम पार पडला आहे. तर विसर्जन मिरवणुकीतील काही खास वैशिष्ट्ये जाणून घ्या.
पहिल्यांदाच निर्बंधमुक्त गणेशोत्सवराज्यात कोरोनानंतर पहिल्यांदाच कोरोनाचे कोणतेही निर्बंध लागू नसलेला गणेशोत्सव यंदा पार पडला. यावेळी मास्क घालण्याचे, अंतर ठेवण्याचे कुठलेही निर्बंध नसल्यामुळे मोठ्या उत्साहात गणेशभक्त यावर्षी सहभागी झाले होते.