यात्रेत सहभागी होण्यासाठी पैसे घेतले? पूजा भट्टने केला खूलासा

in #digras2 years ago

सध्या भारतात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रातेची चांगलीच चर्चा आहे. या यात्रेला चांगलाच प्रतिसाद मिळत असला तरी यामूळे अनेक वादही तयार होतांना दिसत आहे. नुकतीच ही यात्रा महाराष्ट्रातून गेली. या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

हा प्रवास सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. कन्याकुमारी ते केरळ अशी ३५०० किलोमीटरची पदयात्रा काढली. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांचा प्रवास करत गेल्या सात नोव्हेंबरला ही यात्रा सुरु होती. या यात्रेत अनेक कलाकार सहभागी झाले होते. यामध्ये पूजा भट्ट, अमोल पालेकर, रिया सेन, रश्मी देसाई आणि इतर काही कलाकारही सहभागी झाले होते.
हेही वाचा: Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत छोट्या पडद्यावरील कलाकारही सामील

मात्र काही इतर पक्षांना या कलाकाराचं या यात्रेत सहभागी होणं पचलेलं नाही. त्यातच भाजपचे अमित मालवीय यांनी या यात्रेत सहभागी होण्यासाठी कलाकारांना काँग्रेसने पैसे दिल्याचा दावा केला. भाजपने आरोपात म्हटंल होत की, या सर्व कलाकारांना एक मेसेज पाठवण्यात आला होता. यात नावाचा उल्लेख नव्हता. यी मेसेज मध्ये म्हटंल होत की या कलाकारांनी त्यांची फी सांगावी आणि ठरवलेल्या वेळेत १५ मिनिटं राहुल गांधी यांच्यासोबत रॅलीत चालायचंय. त्यानंतर काँग्रेसने या आरोपांच खंडन करत केवळ आमची बदनामी करत असयाचं म्हटंलय.हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

मात्र हे समजल्यानंतर अभिनेत्री पूजा भट्ट ही चागंलीच संतापलेली दिसतेय. तिने भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटला रिट्वीट केले आहे. नितेश राणे यांनी 'राहुल गांधी यांची यात्रा स्टेज मॅनेज असून राहुल गांधी यांच्यासोबत चालण्यासाठी आणि बोलण्यासाठी कलाकारांना पैसे दिले...हा त्याचा पुरावा आहे. सब गोलमाल है भाई... ये पप्पू कभी पास नही होगा' असं ट्वीट केलं होतं. रिट्वीट करत पुजाने म्हटंल की 'त्यांनी नक्कीच असा विचार करावा. त्यांना त्यांचे मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे... पण त्यापूर्वी मी इतर कोणासोबत राहण्यापेक्षा मी तुमच्यासोबत राहू शकेन का असा विचार करेन. अनेकजण बहुमताच्या शासनाचे पालन करत नाही हे त्या व्यक्तीवर आधारित असते' या आशयाचे ट्वीट पूजा भट्टने केले आहे.