IAS ऑफिसर हॉस्पिटलमध्येच ढसाढसा रडल्या; रडतंच दिले आदेश

in #digras2 years ago (edited)

Canva__26_.jpgएका IAS ऑफिसर महिलेचा रडतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. अपघातातील जखमी रूग्णांना भेटायला गेलेल्या या महिला ऑफिसरचा व्हिडिओ पाहून अनेकांनी या व्हिडिओला शेअर केले आहे. रूग्णांची हॉस्पिटलमधील अवस्था पाहून रडत रडतच आदेश दिल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. (IAS Officer Crying Viral Video)

दरम्यान, व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तरप्रदेशमधील लखनऊच्या विभागीय आयुक्त रोशन जेकब यांचा असल्याचं समोर आलं आहे. अधिक माहितीनुसार, एका अपघातातील जखमी रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या गैरसोयीमुळे विभागीय आयुक्त त्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती आहे. तर त्या भेटीत एका लहान मुलाची अवस्था पाहून त्यांना रडू कोसळले आहे.