स्वतःचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करणं लेडी कंडक्टरला पडले महागात, पाहा VIDEO

in #digras2 years ago

Screenshot_2022-10-03-15-03-35-59_92b64b2a7aa6eb3771ed6e18d0029815.jpgस्वतःचे व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल करणे उस्मानाबाद जिल्ह्यातील एका लेडी कंडक्टरला चांगलंच महागात पडलं आहे. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत या लेडी कंडक्टरला एसटी महामंडळाने निलंबित केलं आहे. मंगल गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारामध्ये लेडी कंडक्टर म्हणून नोकरीस आहेत. त्या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलॉवर्स देखील आहेत.

मंगल गिरी यांच्या एका व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावरचा त्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे आणि अशा व्हिडिओमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचं सांगत त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकार्यालाही निलंबित करण्यात आलं आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या एसटी महामंडळाच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होतोय.

(सर्व विसरून बेधुंद होऊन नाचला, गरब्याच्या आनंदात ठाण्यातील 25 वर्षीय तरुणाचा गेला जीव; कुटुंबावर शोककळा)

दरम्यान निलंबन करताना एसटी विभागाने फक्त डेपोमधील बोर्डवर नोटीस लटकवली आहे. त्यात निलंबन का केले? याचा उल्लेख करण्यात आला नाही. यावर 'न्यूज 18 लोकमत'ने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी यावर बोलण्यास तयार नाहीत. तर मी एसटीच्या विरोधात काहीच केले नसून केवळ माझी बदनामी करण्यासाठीच हा प्रकार केला असल्याचा आरोप महिला कर्मचारीने केला आहे.

First published: October 02, 2022, 23:55 IST
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

शरद पवार उद्धव ठाकरेंसोबत, शिंदे गटाविरोधात उतरले निवडणुकीच्या मैदानात!
Dasara Melava : शिवसेनेचा तिसरा टीझर प्रदर्शित, आम्ही त्याच लढाईची वाट पाहत आहोत म्हणत ठाकरेंची सिंहगर्जना...
नवरात्रीच्या गरब्यादरम्यान धक्कादायक घटना, वाशिममधील दोघांचा मृत्यू
हृदयद्रावक! शेवटी पाणीही मिळालं नाही; विहिरीजवळ जाताच बीडमधील मायलेकासोबत घडलं भयानक