बळिराजाला मदत; साडेतीन हजार कोटी प्रशासनाकडे सुपूर्द

in #digras2 years ago

मुंबई : राज्य सरकारने आज अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देतानाच मदतीसाठीची रक्कम प्रशासनाकडे सुपूर्द केली आहे. मागील तीन महिन्यांमध्ये राज्याला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला असून यामुळे पिकांबरोबरच शेत जमिनीचेही मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून ३ हजार ५०१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.
ताज्या
शहर

|| गणेशोत्सव ||
गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा
ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

बळिराजाला मदत; साडेतीन हजार कोटी प्रशासनाकडे सुपूर्द
Published on : 10 September 2022, 7:25 pm

By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य सरकारने आज अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देतानाच मदतीसाठीची रक्कम प्रशासनाकडे सुपूर्द केली आहे. मागील तीन महिन्यांमध्ये राज्याला अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला असून यामुळे पिकांबरोबरच शेत जमिनीचेही मोठे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून ३ हजार ५०१ कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.

जून महिन्यापासून राज्यभरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतमालाच्या झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने ३ हजार ५०० कोटी ७१ लाख रुपये मदतीच्या वितरणास मान्यता दिली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद या विभागांत सर्वाधिक, तर कोकण विभागात सर्वात कमी नुकसानीची नोंद झाली आहे.राज्यात अतिवृष्टी, पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी जिरायती पिकांसाठी १३ हजार ६०० रुपये प्रतिहेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत तर बागायती पिकांसाठी प्रतिहेक्टर २७ हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत ३६ हजार रुपये मदत करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. राज्यात अंदाजे १८ लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. त्यात वाढ झाली असून २३ लाख, ८१ हजार ९२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे

Sort:  

Aapki news ko live follow kiya hai mere bhi news ko like follow Karen