पुणे महापालिकेला मिळणार नवीन आयुक्त Published on : 29 September 2022, 7:00 pm

in #digras2 years ago

पुणे : महाराष्ट्रात आज ४४ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या नावाचा समावेश नाही. पण लवकरच पुणे महापालिकेला नवीन आयुक्त मिळतील अशी चर्चा आहे. नवीन आयुक्त म्हणून यापूर्वी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राहिलेले आणि सध्याचे नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती होणार असल्याचे निश्चित झाले असून, यावर मुख्यमंत्री न उपमुख्यमंत्री यांचे एकमत झाले आहे. अशी माहिती खात्रीशीर सुत्रांनी दिली.

महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांचा नुकतीच दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे त्यांची बदली होण्याची चर्चा दिल्या काही दिवसापासून सुरू आहे. गणेशोत्सवानंतर विक्रम कुमार काही दिवस वैद्यकीय रजेवर गेले होते त्यामुळे बदली निश्चित असल्याचे सांगण्यात आले मात्र ते काही दिवसात पुन्हा महापालिकेत कार्य झाल्याने कुमार यांची बदली लांबीवर पडल्याची चर्चा सुरू झाली. शासनाने आज रात्री उशिरा राज्यातील अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पण त्यामध्ये विक्रम कुमार व हर्डीकर यांच्या नावाचा समावेश नाही. मात्र, पुणे महापालिकेच्या आयुक्त पदासाठी हळदीकर यांचे नाव निश्चित झाले असून, याची लवकरच ऑर्डर निघेल अशी माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली.

Sort:  

Good