Crime: धक्कादायक! प्रियकरासाठी मोठ्या बहिणीने केली लहान बहिणीची हत्या Published on : 6 October 2022, 1:36 pm

in #digras2 years ago

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

Crime: धक्कादायक! प्रियकरासाठी मोठ्या बहिणीने केली लहान बहिणीची हत्या
Published on : 6 October 2022, 1:36 pm

By
सकाळ डिजिटल टीम

नात्याला काळीमा फासणारी घटना अहमदनगरच्या कोपरगावातून येत आहे. लहान बहिणीने मोठ्या बहिणीचे प्रेम संबंधांची घरच्यांना माहिती दिली या रागातून सख्या मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या गळा अवळून हत्या केली आहे. ही घटना 30 सप्टेंबरला घडली आहे.

16 वर्षीय हर्षदाचा ओडणीच्या सहाय्याने गळा आवळूतीची हत्या करून तीने गळफास घेतला हे दर्शवण्यासाठी तीने लहान बहिनीला लटकवल्याची माहिती मिळत आहे. मृत हर्षदाची 19 वर्षीय मोठी बहीण सृष्टी बानकर हिचे श्रीरामपुर तालुक्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. आणि ती प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे मृत हर्षदा समजल्याने तीने घरी सांगितले.

हेही वाचा: Dasara Melava: ठाकरे-शिंदे गटांच्या मेळाव्यांवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

त्यामुळे सृष्टीने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हर्षदाची हत्या केली. हत्येनंतर आरोपी सृष्टी हि प्रियकरासोबत पळून गेली. कोपरगाव पोलिसांनी घटनेचा तपास करत आरोपी बहीण सृष्टी आणि तिचा प्रियकर यांना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून अटक केले आहे. आरोपी सृष्टी बानकर हिच्यावर कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या हत्या प्रकरणात सृष्टीचा प्रियकर तसेच अन्य कोणी सहभागी आहेत का याबाबतचा अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे.

Sort:  

🙏🙏