अभियांत्रिकी प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

in #digras2 years ago

ताज्या
शहर

गेम्स
मनोरंजन
देश
क्रीडा

ग्लोबल
महाराष्ट्र
फोटो
आणखी

अभियांत्रिकी प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर
Published on : 12 October 2022, 1:35 pm

By
सकाळ वृत्तसेवा
अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची अंतिम गुणवत्ता यादी बुधवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आली.

पुणे - अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची अंतिम गुणवत्ता यादी बुधवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी) ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून २१ ऑक्टोंबर पर्यंत पहिली प्रवेश फेरी पार पडणार आहे. राज्यातील शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांसाठीच्या बी.ई किंवा बी.टेक प्रवेश प्रक्रियेत ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी शनिवार (ता.१५) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित, विद्यापीठांशी संलग्न, विद्यापीठातील विभाग आणि विनाअनुदानित महाविद्यालये, शैक्षणिक संस्थांमध्ये अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या (बी.ई आणि बी.टेक) पहिल्या वर्षाच्या आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यंदा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता ‘कॅप’अंतर्गत प्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या होणार आहेत. प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी १२ ते २१ ऑक्टोबर, दुसरी फेरी २२ ते ३१ ऑक्टोबर आणि तिसरी फेरी १ ते ९ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली आहे. राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये, संस्थांचे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबरपासून सुरू करावीत, अशी सूचना सीईटी सेलने दिली. याबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थी-पालकांनी ‘https://cetcell.mahacet.org/’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही सीईटी सेलने केले आहे.

Sort:  

👍👍👍