कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी प्रकाश आंबेडकरांचे नावं? वंचितने स्पष्ट केली भूमिका
सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. अगामी येऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. दरम्यान, काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित बहुजन आघाडीने हे वृत्त फेटाळलं आहे. काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. शिवाय निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट खोट्या बातम्या पेरण्याचं काम करत असतो, असं वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केलं आहे. याबाबत वंचितने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. यात त्यांनी हा खुलासा केला आहे