Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख झाली जाहीर; iPhone 13 सह अनेक व

in #digras2 years ago

अमेझॉनने अखेर अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हलची तारीख निश्चित केली आहे. कंपनीने ॲपवर सेलचा बॅनर लाईव्ह केला असून, त्यामध्ये सेल २३ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र, हा सेल किती काळ चालेल याबाबत कंपनीने काहीही सांगितले नाही. तसंच सेल्समध्ये असलेल्या ऑफर्सची घोषणा सुद्धा कंपनीद्वारे करण्यात आलेली आहे. मेगा फेस्टिव्हल सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि ब्युटी, होम आणि किचन अप्लायन्सेस, टीव्ही, किराणा सामान आणि बरेच काही कमी किंमतीत खरेदी करू शकतात.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर अशी माहिती मिळाली आहे की, जर ग्राहकांनी फेस्टिव्हल सेलमध्ये खरेदीसाठी एसीबीआय कार्डचा वापर केला तर त्यांना १०% इन्स्टंट डिस्काउंट दिला जाईल. तसंच ग्राहकांच्या पहिल्या खरेदीवर त्यांना १०% कॅशबॅक देखील दिला जाईल.आमझोन-२०२२-1.jpg

Sort:  

Plz like me my all post