विश्लेषण : दिल्लीत केजरीवाल सरकार आणि उपराज्यपालांमध्ये पुन्हा संघर्ष, नेमका वाद

in #digras2 years ago

देशाची राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आप सरकार आणि उपराज्यपालांचा संघर्ष नवा नाही. आप दिल्लीत सत्तेत आल्यापासून या ना त्या कारणाने केजरीवाल सरकार आणि उपराज्यपालांचा संघर्ष सातत्याने पाहायला मिळत आहे. आताही पुन्हा दिल्ली सरकार आणि उपराज्यपालांमध्ये संघर्ष होत आहे. यावेळचा विषय दिल्ली परिवहन महामंडळाने (DTC) खरेदी केलेल्या १,००० बसेसचा आहे. हा वाद नेमका काय? यावर दोन्ही बाजूंनी नेमका काय युक्तिवाद होत आहे? याचा हा आढावा…

दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी रविवारी (११ सप्टेंबर) दिल्ली परिवहन महामंडळाच्या या बस खरेदीची चौकशी करण्याबाबतची तक्रार सीबीआयकडे पाठवण्यास मंजुरी दिली आहे. यानंतर आपने या निर्णयावर सडकून टीका केली आहे. उपराज्यपाल सक्सेना त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून जनतेचं लक्ष्य हटवण्यासाठी अशाप्रकारचे विनाधार आणि खोटे आरोप करत आहेत, असं आपने म्हटलंयkejriwal-Saxena-Delhi.jpg