तर लढाईचीच…” कोर्टातील खटल्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी थोपटले

in #digras2 years ago

![uddhav-thackeary-compressed.jpg](शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही गटांना अनुक्रमे मशाल आणि ढाल-तलवार ही निवडणूक चिन्हे मिळाली आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दोन्ही गटातील या संघर्षावर थेट भाष्य केले. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागत आहे. मैदानात या. मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहात आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते मुंबईत छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.)