धनुष्य-बाण चिन्हाचा वाद : हंगामी आदेशास ठाकरे गटाचा विरोध; दोन्ही गटांच्या

in #digras2 years ago

![Eknath-Shinde-Uddhav-Thackeray-4.jpg](नवी दिल्ली : अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या ‘धनुष्य-बाण’ या निवडणूक चिन्हावरील हक्कासंदर्भात तातडीने निर्णय घेण्याची विनंती एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली असली, तरी ठाकरे गटाने मात्र या मागणीला कडाडून विरोध केला आहे. दोन्ही गटांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी आणि सत्यता तपासून पाहिल्यानंतर अंतिम निर्णय घ्यावा, फक्त पोटनिवडणुकीसाठी हंगामी आदेश देऊन निवडणूक चिन्ह गोठवण्यात येऊ नये, अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.

शिंदे गटाच्या वतीने वकील चिराग शहा यांनी निवडणूक चिन्हाच्या हक्कासंदर्भात ४ ऑक्टोबर रोजी सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंधेरी-पूर्व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या ‘धनुष्य-बाण’ या निवडणूक चिन्हाचा वापर करू देण्याची मागणी शिंदे गटाने आयोगाकडे केली आहे. त्यासंदर्भात ठाकरे गटाने उत्तर आणि कागदपत्रे सादर केलेली नाहीत. आवश्यक कागदपत्रे शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत सादर करावीत, असे पत्र आयोगाने ठाकरे गटाला पाठवले आहे. ‘‘दोन्ही गटांना कागदपत्रांसाठी ७ ऑक्टोबपर्यंत मुदत देण्यात आली होती,’’ असे आयोगाने पत्रात नमूद केले आहे)