तिहार प्रकरणात तेलमालिश करणारा चक्क अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा आरोपी

in #digras2 years ago

![Asif_balapure.jpg]दिल्ली - आर्थिक गैरप्रकाराच्या आरोपांखाली तिहार तुरुंगात असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या ‘कारागृह मसाज' प्रकरणात आज नवा ट्विस्ट समोर आला. मंत्री जैन यांना तेलमालिश करणारा चक्क अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचा आरोपी असल्याचे तुरुंगातील सूत्रांनी सांगितल्यावर भाजपने आप व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा जोरदार हल्लाबोल केला. कॉंग्रेसनेही या प्रकरणी केजरीवाल यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.सत्येंद्र जैन यांचा ‘समाज' विह्डीओ समोर आल्यावर आपने त्यांना फिजीओथेरपी दिली जात असल्याचा दावा केला होता. आता दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी यातील ‘बातमीमागची बातमी‘ समोर आणल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेचा विषय ठरले. जैन यांना मालीश करणारा ‘रिंकू‘ या तरूणावर पॉस्को कायद्यांतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.)Asif_balapure